
ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना
ठक्करबाप्पा योजना अनु. जमातीच्या वास्तव्य असलेल्या गावामधे मुलभुत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे यामधे आदिवासी वस्तीमधे अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौच्यालय, मंगल कार्यालय, समाज मंदिर, पिण्याचे पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, शालेय इमारत खोली बांधकामे, स्मशान भूमी शेड, पथदिवे, सोलर सिस्टीम इत्यादी सार्वजनिक सुविधा आदिवासी लोकसंखेच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतात यासाठी १५० ते ५०० लोकसंखेकरीता ५ लक्ष रुपये, ५०१ ते १००० साठी १० लक्ष रूपये, १००१ ते १५०० साठी १५ लक्ष रुपये, १५०१ ते २००० साठी २० लक्ष व २००१ ते २५०० साठी २५ लाखाच्या पुढे प्रमाणे प्रति कामास अनुदान दिले जाते. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जिल्हा परिषदेमार्फत करून घेण्यात येतात. एका वेळेस एक गावत दोन कामे घेता येतात. मंजूर केलेल्या अनुदानामधे काम पूर्ण झाले पाहिजे अपूर्ण कामासाठी या योजनेत पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जात नाही.