Home » सामाजिक सुरक्षा योजना

सामाजिक सुरक्षा योजना






Combined Table


Image

कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात तसेच ते कमी वेतनात काम करत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते व आर्थिक स्थिती गरीब असल्या कारणामुळे त्यांना त्यांचा विवाह करण्यासाठी लागणार खर्च परवडण्यासारखा नसतो व त्यामुळे त्यांना स्वतःचा विवाह करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते तसेच त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा विचार केला.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. व लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. [Bandhkam Kamgar Yojna]

Bandhkam Kamgar Yojna चे उद्दिष्ट

● राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी आर्थिक सहाय्य करणे..

● कामगारांचे जीवनमान सुधारणे.

● कामगारांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये. [Bandhkam Kamgar Yojna]

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

● योजनेअंतर्गत लाभार्थी कामगाराला त्याच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले केले जाते.

अर्जदारासाठी आवश्यक पात्रता

● अर्जदार कामगार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

● आधार कार्ड

●पॅन कार्ड

●प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र

● विवाह नोंदणी प्रमाणपत्र

● रहिवाशी दाखला

● 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

● कायमचा पत्ता पुरावा

● ई-मेल आयडी

● मोबाईल नंबर

● काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता

● नोंदणी अर्ज

● पासपोर्ट आकारातील 3 फोटो

● बँक पासबुक झेरॉक्स

● जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)

● ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

● घोषणापत्र


File Name Preview Download