Home » महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना






महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना


Image

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना

राज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे स्वतःच्या घरापासून दूर ऊन, वारा व पावसात स्वतःची पर्वा न करता काम करत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंजा पगारात काम करत असतात त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी व त्यांच्या गरज पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच काम करताना त्यांच्याजवळ सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघातांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते व काही वेळेला त्यांचा मृत्यू देखील होतो व घरातील कमावती व्यक्तीच्या एकाएकी जाण्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगाराच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना उद्देश

●महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

● कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे.

● बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे.

● धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे.

● रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.

● सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे. [Bandhkam Kamgar]