Home » ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना

ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना






ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना


Image

ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना

शासनमान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि गुणात्मक विकास व अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने सन 1984 पासून अनुक्रमे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ योजना सुरु केली. सन 1992-93 पासून शहरी व ग्रामिण भागातून हे पुरस्कार राज्यातील 8 आदर्श ग्रंथालयांना देण्यात येतो. उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवकासाठी ‘डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ देण्याची अभिनव योजना सन 1992-93 पासून सुरू केलेली आहे. त्यामध्ये आदर्श कार्यकर्ता व सेवक राज्यस्तर प्रत्येकी -1 प्रमाणे व प्रत्येक महसूल विभागातून 1 कार्यकर्ता व 1 सेवक असे एकूण 14 पुरस्कार दिले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार रक्कम अनुक्रमे 50,000/-, 30,000/-, 20,000/- व 10,000/- व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावाने राज्यातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यासाठी राज्यस्तरावरून रु.25,000/- व विभागस्तरावरून रु.15,000/- अशी रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतात.