Home » कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ






भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर बाबत शासन निर्णय जारी !


Image

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपुरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये या विविध पुरस्कार, त्यांचे निकष, स्वरुप, पुरस्कारांची रक्कम, निवड समिती व कार्यपद्धतीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पुरस्कारांच्या रकमेमध्ये तसेच पुरस्कार्थीच्या दैनिक व प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ शासन निर्णयः-

कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या खालील विविध पुरस्कारांची संख्या व रकमांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे :-

विविध कृषि पुरस्कारांची संख्या व पुरस्काराच्या सुधारित रकमा:-

अ.क्र. पुरस्काराचे नाव पुरस्कारांची संख्या सद्याची पुरस्काराची रक्कम पुरस्काराची सुधारित रक्कम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार रु.७५,०००/- ३,००,०००/-
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार रु. ५०,०००/- २,००,०००/-
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार रु. ५०,०००/- २,००,०००/-
कृषिभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार रु. ५०,०००/- २,००,०००/-
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार रु.३०,०००/- १,२०,०००/-
युवा शेतकरी पुरस्कार रु.३०,०००/- १,२०,०००/-
उद्यानपंडीत पुरस्कार रु. ५०,०००/- २,००,०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- सर्वसाधारण गट ३४ रु.११,०००/- ४४,०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- आदिवासी गट रु.११,०००/- ४४,०००/-
१० पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार १०
११ उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार

पुरस्कार्थीना पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता द्यावयाच्या दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात येत असून, दैनिक व प्रवास भत्त्याची रक्कम प्रति पुरस्कार्थी रु. १५,०००/- इतकी अनुज्ञेय राहिल. सदर दैनिक व प्रवास भत्ते विहित कार्यपद्धतीनुसार देण्यात येतील.

सदर शासन निर्णयानुसार पुरस्काराच्या रकमांमध्ये तसेच दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत होणारी वाढ सन २०२० पासूनच्या विविध कृषि पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी लागू राहील.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं. क्र. ३६१/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून तसेच मा. उपमुख्यमंत्री (वित्त), उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय :

कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबधित कार्याकरीता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची संख्या, पुरस्कारांच्या रकमेमध्ये तसेच पुरस्कार्थींच्या दैनिक व प्रवास भत्त्या मध्ये वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.