Home » मुलगी दत्तक योजना(लाडकी लेक दत्तक योजना)

मुलगी दत्तक योजना(लाडकी लेक दत्तक योजना)






मुलगी दत्तक योजना(लाडकी लेक दत्तक योजना)


Image

मुलगी दत्तक योजना(लाडकी लेक दत्तक योजना)

महिलांचे प्रमाण वाढावे व स्त्री भ्रूण हत्या रोखली जावी यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘ मुलगी दत्तक योजना’ सुरु केली आहे. याअंतर्गत, एप्रिल २०१३ नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीमागे लोकसहभागातून रक्कम १०, ००० रुपये व महानगरपालिकेचे २०, ००० रुपये असे एकुण रु. ३०, ००० राष्ट्रीयीकृत बँकेत दामदुप्पट योजनेमध्ये ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे, या योजनेअंतर्गत पालकाने एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास पालकाने स्वतः किंवा लोकसहभागातून जमा केलेली रक्कम १०, ००० रुपये व पुणे महानगरपालिकेची रक्कम ४०, ००० रुपये असे एकुण ५०, ००० रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविण्यात येतील. सदरची रक्कम लाडक्या लेकीच्या लग्नासाठी, उच्च शिक्षणासाठी व भवितव्यासाठी वापरता येईल.